महाराष्ट्रात एसआयआर प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

Share

अर्ज भरण्यास १३ नोव्हेंबरपर्यंत मुदत; अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई : महाराष्ट्रात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया सुरू असताना अर्ज भरण्याच्या मुदतीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतून नाव वगळणे तसेच नाव आणि पत्त्यातील बदलांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

या प्रक्रियेंतर्गत नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज क्रमांक ६, मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी अर्ज क्रमांक ७, तर नाव व पत्त्यातील तपशील दुरुस्त करण्यासाठी अर्ज क्रमांक ८ भरता येणार आहे.

प्राप्त दावे आणि हरकती निकाली काढण्यासाठी २५ नोव्हेंबर २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

मतदारांनी विहित मुदतीत आवश्यक अर्ज सादर करून मतदार यादीतील आपले नाव आणि तपशील तपासावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *