छठपूजेनंतरही आक्सा चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई : यंदा १५ आणि १६ तारखेला छठपूजेसाठी परवानगी देण्यावरून वाद निर्माण झाला होता. मोठ्या संख्येने भाविक समुद्रकिनाऱ्यावर येत असल्याने निर्माण होणारा कचरा, फटाक्यांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण आणि समुद्राच्या पाण्याचे प्रदूषण, असे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. न्यायालयाचे फटाके वाजविण्यासंदर्भातील निर्बंध असतानाही त्यांचे उल्लंघन होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती.
मात्र, छठपूजा पार पडल्यानंतर समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेबाबत आवश्यक ती तत्परता दिसून आलेली नाही. किनाऱ्यावर पडून असलेला कचरा अद्याप हटविण्यात आलेला नसल्याने पर्यटकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनाही या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत आहे.
छठपूजेला परवानगी देण्यावरून पर्यावरण आणि स्वच्छतेचे मुद्दे उपस्थित झाले असताना, पूजेनंतरच्या स्वच्छतेची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. उत्सव साजरे करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याची जबाबदारीही महत्त्वाची आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने कचरा हटवून आक्सा चौपाटी पूर्ववत स्वच्छ करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


Share

3 thoughts on “छठपूजेनंतरही आक्सा चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य.”

  1. काम कोणाला नको आहे फक्त वरिष्ठ आले कि समोर हलवा हलवी करायची नंतर भगवान भरोसे कोणाला काहिहि घेण देण नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *