आरे रोडवरील पादचारी सबवेला अनधिकृत जाहिरातबाजीचा विळखा!

Share

एसएमएस-प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

भिंती आणि जिन्यांवर जाहिरातींचे पोस्टर; पादचाऱ्यांमध्ये नाराजी, प्रशासनाचे दुर्लक्ष.

मुंबई : गोरेगाव पश्चिम आणि पूर्वेला जोडणाऱ्या आरे रोडवरील पादचारी सबवेला अनधिकृत जाहिरातबाजीचा विळखा पडला आहे. या सबवेच्या भिंतींसह जिन्यांवर ठिकठिकाणी जाहिरातींचे पोस्टर चिकटवण्यात आले असून, त्यामुळे सबवेचे विद्रूपीकरण होत आहे. तसेच परिसरात अस्वच्छताही निर्माण होत आहे.

गोरेगाव पश्चिम आणि पूर्वेकडील नागरिकांना रेल्वेचा पादचारी पूल ओलांडल्याशिवाय ये-जा करण्यासाठी हा सबवे सोयीचा पर्याय आहे. विशेषतः पादचाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा आणि सुरक्षित मार्ग मानला जातो. मात्र, या महत्त्वाच्या सबवेच्या स्वच्छतेकडे आणि देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.

काही जाहिरातदारांकडून कोणतीही परवानगी न घेता भिंतींवर आणि जिन्यांवर जाहिरातींचे पोस्टर चिकटवले जात आहेत. त्यामुळे संपूर्ण सबवे जाहिरातींनी व्यापला असून, त्याचे विद्रूपीकरण होत आहे. या अनधिकृत जाहिरातबाजीमुळे सबवेचे सौंदर्यही हरवत चालले आहे.

पालिका प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन अनधिकृत जाहिराती हटवाव्यात, संबंधितांवर कारवाई करावी आणि सबवेची नियमित स्वच्छता राखावी, अशी मागणी पादचारी नागरिकांकडून होत आहे.


Share

2 thoughts on “आरे रोडवरील पादचारी सबवेला अनधिकृत जाहिरातबाजीचा विळखा!”

  1. विना कारण कोणी हि पोस्टर चिपकवत नाहि हे सर्व चिरी मिरी घेतलया शिवाय आधी तिथे लक्ष दिले पाहिजे

  2. कधीही लोकसुधारनार??प्रशासनाचे काय येथे लक्ष्य नाही?सुंदर मुंबई कशी होणार??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *