
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई . दिनांक २७ जून २०२६ रोजी इन्फिनिटी मॉलमध्ये झालेल्या अफाट गर्दीच्या घटनेत पोलिसांच्या तत्परतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळे इन्फिनिटी मॉल प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
आम्ही मागील अनेक महिन्यांपासून या मॉलमध्ये चेंगराचेंगरी होण्याची शक्यता व्यक्त करत होतो. दि. १९ मे २०२६ तसेच दि. २९ जुलै २०२५ रोजीही यासंदर्भात इशारा देण्यात आला होता. अशी माहिती. मनसे पदाधिकारी मनीष शेटकर यांनी दिली.दिनांक २७ रोजी घडलेल्या घटनेस मॉल प्रशासन तसेच संबंधित महापालिका अधिकारी विजय मानकर हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचे मनसे च्या वतीने बीडीओ बनवून आरोप करण्यात आले आहे..
मॉलमधील अनेक स्टॉल आणि दुकाने अनधिकृत असून ती जिन्यांच्या शेजारी तसेच मुख्य वर्दळीच्या ठिकाणी उभारण्यात आली आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षित हालचालींना अडथळा निर्माण होऊ शकतो.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्य वर्दळीच्या ठिकाणी, स्वच्छतागृहाकडे जाणाऱ्या मार्गांवर तसेच मॉलच्या प्रवेश व निर्गमन मार्गांवरील अनधिकृत स्टॉल तात्काळ हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कमी किमतीच्या आमिषपूर्ण ‘सूट’ योजनांचे योग्य नियोजन, गर्दी नियंत्रण व्यवस्था आणि सुरक्षा उपाययोजना केल्यानंतरच अशा विक्री मोहिमा आयोजित करण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.
सदर मागण्यांचे पालन न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडून हा प्रश्न मार्गी लावेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
विभाग अध्यक्ष शशांक देहेलीकर यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी मनसे (रस्ते आस्थापना) प्रभाग संघटक मनिष शेटकर, उपविभाग अध्यक्ष हेमंत कासले, शाखाध्यक्ष सुनील घुंगे, मनविसे विभाग अध्यक्ष आकाश जाधव, मनविसे जिल्हा संपर्क अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.