एसएमएस -उत्कर्ष बोरले.
मुंबईच्या बोरिवली आणि ठाणे येथे दोन ७परिवहन कार्यालयात एकच महिलेच्या नावावर दोन परमिट असल्याचे समोर आले आहे. दहिसर पूर्वेतील कोकणी पाडात राहणाऱ्या शोभा हुलमुख यांच्या नावावर बोरिवली परिवहन कार्यालयात आणि ठाणे कार्यालयात प्रत्येकी एक एक असे दोन ऑटो रिक्षाचे परमिट असल्याची माहिती मिळाली आहे. या बाबत माहिती घेतल्यावर कळले की शोभा होलमुख यांच्या नावे बोरिवलीत एमएच-४७/डी ४६२९.
तसेच ठाणे येथे एमएच ०४/एचजे -५०५६ या दोन ऑटो परमिट सह नोंद असल्याची माहिती हाती आली आहे.या बाबत ठाणे परिवहन अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यावर त्यांनी या बाबत होकार दिला.या बाबत तक्रारदार भूपेश मिश्रा आरटीओ एजन्ट यांनी या बाबत माहिती दिली तसेच या प्रकरणाची तक्रार वरिष्ठ परिवहन अधिकारी आणि आयुक्ताकडे करणार असल्याचे सांगितले आहे.
कोट :हो ही बाब आमच्या निदर्शनात आली आहे. आम्ही या बाबत तपास करत आहोत. तसेच ऑटो रिक्षा स्क्रॅप बाबत माहिती घेऊन सांगतो -सहाय्यक परिवहन अधिकारी -ठाणे -प्रसाद नलावडे.
या बाबत शोभा हुलमुख यांच्याशी मोबाईल वर संपर्क केला असता त्यांनी उत्तर नाही दिले. तसेच फोन कट केला व दुसऱ्या मोबाईल नंबर वरून कॉल करून प्रत्यक्षात येऊन बोला -शोभा हुलमुख
या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर मी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली व या गैर प्रकारा बाबत विचारणा केल्यावर त्यांनी उडवा उडवी केली -भूपेश मिश्रा -तक्रारदार.
बोरिवली :अनिल वाळीव -प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच सह परिवहन अधिकारी बोरिवली यांना ही मोबाईल वरून संपर्क केला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही.