
एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोरले.
मुंबई, : अंधेरी पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील शहाजीराजे मार्गावरील छोट्या वळणावर काही दिवसांपूर्वी डांबरीकरण करून गतिरोधक उभारण्यात आला होता. त्यामुळे या वळणावरून येणाऱ्या वाहनांचा वेग नियंत्रित होऊन अपघाताचा धोका कमी झाला होता.
मात्र, काही दिवसांतच हा गतिरोधक बुलडोझरच्या सहाय्याने काढण्यात आला. त्यावेळी निर्माण झालेला मोठ्या प्रमाणातील मलवा वळणाजवळच एका ठिकाणी डोंगरासारखा साचून ठेवण्यात आला. परिसरात आधीच कचऱ्याची समस्या असताना या मलव्यामुळे स्थानिक नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागला.
सदर मलवा हटविण्याबाबत अनेकदा विनंत्या करूनही “के” पूर्व विभागाकडून दिरंगाई करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अखेर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बुलडोझरच्या सहाय्याने हा मलवा हटविला.
वेळेतच मलवा उचलण्यात आला असता तर नागरिकांना त्रास सहन करावा लागला नसता आणि जनतेच्या पैशाचाही अपव्यय टाळता आला असता, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली. तसेच, भविष्यात कचरा व मलवा वेळेवर उचलण्याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
जो पर्यन्त आवाज उठवत नाही तो पर्यन्त सरकारी बाबू याना जाग येत नाही