नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणावरून सरकारवर टीका.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

मुंबई : गोरेगाव येथील नेस्कोमध्ये झालेल्या कथित ड्रग्स पार्टी प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणामुळे मुंबईच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा आरोप त्यांनी केला.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज व मद्य पार्टी होत असताना पोलीस प्रशासन काय करत होते, असा सवाल उपस्थित करत या कार्यक्रमाला परवानगी कोणी दिली याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणामागील सूत्रधार कोण आहे याचाही शोध घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुण पिढीला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, संबंधित रॅकेटचे मूळापर्यंत जाऊन उच्चाटन करावे आणि केवळ दिखाऊ कारवाई न करता ठोस पावले उचलावीत, असेही राजहंस यांनी स्पष्ट केले.


Share

3 thoughts on “नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणावरून सरकारवर टीका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *