पी-उत्तरच्या पी-पूर्व कार्यालयाला अनधिकृत पार्किंग चा विळखा.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

मुंबई: मालाड पूर्व येथील मनपा कार्यालयाजवळ असलेले रामलीला मैदान हे मूळतः खेळाचे मैदान असतानाही, ते हळूहळू अन्य कारणांसाठी वापरले जात आहे तसेच अनधिकृत पार्किंग नी संपूर्ण रस्ता व्यापला आहे.त्या मुळे स्थानिक नागरिक आणि खेळाडूंमध्ये नाराजी पसरली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील मुलांसाठी हे एकमेव खेळाचे मैदान असूनही, प्रत्येक रविवारी ते वैयक्तिक कार्यक्रमांसाठी देण्यात येते. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी योग्य जागा उपलब्ध राहत नाही. हा प्रकार मनमानी कारभार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
परिसरात मोकळेपणाने चालण्यासाठीसुद्धा पुरेशी जागा नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुचाकींची अनियमित पार्किंग केली जाते, तर पदपथांवर फेरीवाल्यांनी स्टॉल्स उभारलेले असतात. विशेष म्हणजे, येथे महानगर पालिका पी-नॉर्थ ईस्ट विभागाचे कार्यालय असतानाही यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नागरिकांनी मनपा पदाधिकारी, तसेच स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनी या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
“हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि खेळाडूंना न्याय मिळाला पाहिजे,” अशी ठाम भूमिका नागरिकांनी व्यक्त केली आहे.


Share

One thought on “पी-उत्तरच्या पी-पूर्व कार्यालयाला अनधिकृत पार्किंग चा विळखा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *