
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या पी/उत्तर विभागातील अतिक्रमण निर्मूलन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण वाघेला यांच्या मार्गदर्शनाखाली ३ जून पासून पात्र फेरीवाल्यांची माहिती संकलित करण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे. तसेच सर्व फेरीवाल्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत असल्याने या प्रक्रियेला फेरीवाल्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
२०१४ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात पी/उत्तर विभागातील सुमारे सात हजार फेरीवाल्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १,२०० फेरीवाले पात्र ठरले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार या पात्र फेरीवाल्यांना १० जूनपर्यंत क्यूआर कोड प्रदान करण्याची प्रक्रिया सध्या सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर उपक्रमामुळे पात्र फेरीवाल्यांची अधिकृत नोंदणी, ओळख आणि व्यवस्थापन सुलभ होण्यास मदत होणार असून, भविष्यात फेरीवाला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीही याचा उपयोग होणार आहे.
दरम्यान, अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत सुरू असलेल्या या मोहिमेला फेरीवाल्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आवश्यक कागदपत्रे व माहिती सादर करण्यासाठी मोठ्या संख्येने फेरीवाले पुढे येत आहेत.
Nice