
फोटो :सामाजिक कार्यकर्ते फिरोझ मिठीबोर वाला

फोटो सलीम साबू वाला
सामाजिक, संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांच्या दबावाखाली सोढावे लागले..
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले
मुंबई, : दिल्ली येथे १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते फिऱोज मिठी बोरवाला आणि सलीम साबूवाला यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप ‘हम भारत के लोग’ या संघटनेने केला आहे. या कारवाईचा संघटनेने निषेध केला असून, ती लोकशाही अधिकारांवर गदा आणणारी असल्याचे म्हटले आहे.
संघटनेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, २ ऑक्टोबरपासून दोन्ही कार्यकर्त्यांना अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून वारंवार नोटिसा व चौकशीच्या माध्यमातून त्रास दिला जात होता. गुरुवारी दिनांक ८ रोजी,दुपारी २ वाजता पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पोलिस ठाण्यात नेले व संध्याकाळी ५ वाजता च्या पर्यंत ताब्यात ठेवले व त्यांना सोढून दिले.
दिल्लीतील प्रस्तावित आंदोलनात विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रिया रद्द करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागण्या करण्यात येणार आहेत. कार्यकर्त्यांच्या स्वातंत्र्य, शांततापूर्ण आंदोलन व प्रवासाच्या अधिकारांवर अशा प्रकारे निर्बंध आणू नयेत, अशी मागणी ‘हम भारत के लोग’ने केली आहे.
तसेच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कामगार संघटना, माध्यमे आणि नागरिकांनी या कारवाईविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष तुषार गांधी, उपाध्यक्ष गुड्डी एस. एल. आणि मीडिया प्रभारी अली भोजानी यांनी केले आहे.तसेच इतर सामाजिक संस्था, संघटनान्नी ही या घटनेचा निषेध करत पोलिसी दबाव वापरून लोकशाही मार्गाने विरोध करने हे आमचे संविधानिक अधिकार आहेत.
आंदोलन, विरोध प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत जाणार म्हणून ताब्यात घेतले मात्र जाऊ नका अशी विनंती वजा आदेश ही पोलिसांना देत तीन तास ताब्यात ठेवले होते. मात्र सामाजिक, संस्था, संघट्नांच्या सतत पाठिंब्या मूळे आम्हाला घरी जाऊ दिले.-फिरोझ मिठीबोरवाला -सामाजिक कार्यकर्ता
Is police notfollowing Constituion?why this illegal things??