
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनकल्याण नगर येथील मदर वेलकनी मैदानात सामाजिक कार्यकर्ते सम्राट बागुल यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांमध्ये वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमात अवैध वृक्षतोड रोखण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. तसेच मुंबईसारख्या शहरी परिसरात विकासकांनी नियमानुसार वृक्ष लागवड करून परिसर अधिक हरित व पर्यावरणपूरक बनविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी/उत्तर उद्यान विभागाचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अंकुश भाटकर, श्री नरेंद्र आपटे आणि श्री गणेश कारंडे यांनी मोलाचे योगदान दिले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचला.
Good