मालाड येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

Share

एसएमएस-प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले.

मुंबई : मालाड पश्चिम येथील राईपाडा परिसरात मैफिल ग्रुपच्या युवकांनी स्वखर्चाने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली. या उपक्रमामुळे परिसरात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी युवकांच्या या पुढाकाराचे मनापासून कौतुक केले.
जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच देशभक्तीपर गीतांद्वारे आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. युवकांनी एकत्र येत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमादरम्यान सुदन कांबळे, दुर्गेश जगताप, दर्शन सावंत, साहिल साळवी, नागेश जाधव, संघराज जाधव, दर्शन सोनवणे, जिघानेश पातारे, हर्ष सावंत तसेच इतर युवक उपस्थित होते. युवकांनी केलेल्या या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमामुळे परिसरात एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
राईपाडा परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवकांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी आणि इतिहासाबद्दलचा अभिमान अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.


Share

2 thoughts on “मालाड येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *