स्वातंत्र्य वीर सावरकर उद्यानात हनुमान जयंती उत्साहात साजरी.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मालाड, ता.२(प्रतिनिधी ) विलेपार्ले पूर्व येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाचे आयोजन उत्सव प्रमुख सिकंदर भगत यांनी केले असून गेली १८ वर्षे ते हा उत्सव स्वखर्चाने साजरा करत आहेत.
या निमित्ताने भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. भक्तिमय वातावरणात कीर्तन, भजन तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेला हा उत्सव दरवर्षी अधिक भव्य होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *