
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई मालाड पश्चिमेतील मालवणी क्रमांक ३ येथील बेकरीलगतच्या गटाराची भिंत खचल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता . तसेच बुधवारी (ता. १६) किराणा सामान घेऊन घरी परतणाऱ्या सीमा ठाकूर या ज्येष्ठ महिलेचा गटाराची भिंत अचानक कोसळल्याने तोल जाऊन पडल्या होत्या. सुदैवाने या वेळी तेथून जाणाऱ्या मनोज त्रिपाठी यांनी धाव घेत ज्येष्ठ महिलेला सावरल्याने मोठी दुर्घटना टळली होती.. मात्र या बाबत दिनांक १८ रोजी, एसएमसमाचार मध्ये वृत्त प्रसारित होताच पालिका जागी झाली व गटाराची दुरुसती केली या गटाराची मागील २० वर्षांपासून दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत होती .तसेच घरांमध्ये पाच व दहा दिवसीय घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच या गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी भाविकांना याच चिंचोळ्या रस्त्यावरून जावे लागणार आहे. त्यामुळे गटार दुरुसती मूळे नागरिकांना व गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला व त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला.व एसएमसमाचार चे आभार व्यक्त केले.