मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात १९ व २० सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरे.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १६२-मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर १९, २०, २६ व २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये नव मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदींची दुरुस्ती तसेच नाव वगळणीसाठी अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी दावे व हरकती सादर करण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. प्रारूप मतदार यादीमध्ये गैरहजर, स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांना सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाहून मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदार म्हणून नाव नोंदविता येणार आहे. या नव मतदारांसाठी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती किंवा वगळणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी प्रियंका आयरे यांनी केले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *