एसएमएस -प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त सुस्वागतम वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रक्तपेढीच्या सहकार्याने शुक्रवार, दिनांक १८ रोजी दहिसर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदाते, मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते तसेच स्थानिक रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिरात एकूण ८२ रक्तपिशव्यांचे संकलन झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संतोष मौर्य यांनी दिली.
रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संतोष मौर्य यांनी सर्व रक्तदाते, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचे आभार मानले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवून गरजू रुग्णांना मदत करण्याचा संदेश या शिबिरातून देण्यात आला.