टच संस्थेची १६ वी ‘क्रिएटिव्ह टच’ चित्रकला स्पर्धा १४ नोव्हेंबरला; ‘चाइल्ड टू चाइल्ड हेल्प’ संकल्पनेतून सामाजिक बांधिलकीचा संदेश
मुंबई : आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांच्या मदतीसाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्यासाठी टच (TOUCH – Turning Opportunities for Upliftment and Child Help) संस्थेच्या वतीने १६ वी ‘क्रिएटिव्ह टच’ चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी दादर पूर्व भोई वाडा येथील सदाकांत धवन मैदानावर ही स्पर्धा दुपारी २ ते सायंकाळी ७.दरम्यान होणार असून, ‘चाइल्ड टू चाइल्ड हेल्प’ अर्थात एका मुलाकडून दुसऱ्या मुलाला मदत, ही या उपक्रमाची मुख्य संकल्पना आहे.
चित्रकलेच्या माध्यमातून गरजू मुलांच्या शिक्षणाला हातभार लावण्याची संधी विद्यार्थ्यांना या स्पर्धेतून मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी साकारलेली चित्रे टच संस्थेला सामाजिक कार्यासाठी योगदान म्हणून दिली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची कलाकृती केवळ स्पर्धेपुरती मर्यादित न राहता गरजू मुलांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहे. सुस्थितीतील मुलांमध्ये सामाजिक संवेदना निर्माण करण्याबरोबरच प्रतिकूल परिस्थितीतील मुलांनाही आपले कलागुण दाखविण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे.
स्पर्धेत चौथी ते सहावी, सातवी ते नववी आणि दहावी ते बारावी असे तीन गट असतील. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकासाठी २० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १० हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये, तर उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत. शासकीय व महानगरपालिका शाळांतील तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश विनामूल्य असून, इतर विद्यार्थ्यांसाठी १०० रुपये नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे.
या कार्यक्रमात टच बालग्राम, विहीगाव येथील विद्यार्थी देशभक्तिपर गीते, भावगीते, पोवाडा तसेच मल्लखांब आणि रोप मल्लखांब यांचे सादरीकरण करणार आहेत. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मुंबईत आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
टच संस्था आदिवासी, ग्रामीण, वंचित आणि रस्त्यावरील मुलांच्या शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. या कार्यात समाजातील इतर मुलांनी आणि पालकांनीही सहभागी व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
या स्पर्धेबाबत आयोजित पत्रकार परिषदेत टचचे प्रकल्प समन्वयक उमाकांत पांचाळ यांनी माहिती दिली. यावेळी संस्थेचे विश्वस्त महेश नागवेकर, स्वयंसेवक डॉ. दाक्षायणी मेनन आणि प्रफुल पालांडे उपस्थित होते. आयसीएसई, सीबीएसई आणि एसएससी बोर्डाच्या शासकीय, निमशासकीय व खासगी शाळांतील तसेच कनिष्ठ महाविद्यालयांतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.
अधीक माहिती करीता : संपर्क : ९८१९४५३८७३ / ९९२३८६१५८२. संकेतस्थळ : www.touchmission.com
निसार अली
टच संस्थेची १६ वी ‘क्रिएटिव्ह टच’ चित्रकला स्पर्धा १४ नोव्हेंबरला; ‘चाइल्ड टू चाइल्ड हेल्प’ संकल्पनेतून सामाजिक बांधिलकीचा संदेश
मालाड , ता. ६ (वार्ताहर ) : आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांच्या मदतीसाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्यासाठी टच (TOUCH – Turning Opportunities for Upliftment and Child Help) संस्थेच्या वतीने १६ वी ‘क्रिएटिव्ह टच’ चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी दादर पूर्व भोई वाडा येथील सदाकांत धवन मैदानावर ही स्पर्धा दुपारी २ ते सायंकाळी ७.दरम्यान होणार असून, ‘चाइल्ड टू चाइल्ड हेल्प’ अर्थात एका मुलाकडून दुसऱ्या मुलाला मदत, ही या उपक्रमाची मुख्य संकल्पना आह