कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

मुंबई : दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटेच्या सुमारास भरधाव BMW कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २०) पहाटे सुमारे ५.०३ वाजता काळ्या रंगाची BMW कार (क्रमांक DD 01 C 6302) मरीन ड्राईव्हहून हाजी अलीच्या दिशेने जात होती. लाला कॉलेजसमोर, लोटस जेट्टीजवळ कोस्टल रोडच्या नॉर्थबाउंड मार्गावरून जात असताना कार पुलाच्या कठड्यावरून खाली पार्किंगचे काम सुरू असलेल्या परिसरात कोसळली.

अपघातानंतर कारमधील चार जणांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यापैकी तिघांना मृत घोषित केले. मृतांमध्ये धैर्य दर्शन शेठ (१७), आदित्य जकासनीया (१९) आणि शनय गजर (२१) यांचा समावेश आहे. आदित्य कल्पेश्वर ओसवाल (२३) हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच ताडदेव पोलिस ठाण्याचे अधिकारी व पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघाताच्या कारणाचा तपास सुरू असून, याप्रकरणी पुढील चौकशी करण्यात येत आहे.


Share

One thought on “कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *