ज्येष्ठ नागरिकांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोरले.

मुंबई : गोरेगाव पूर्वेतील जयप्रकाश नगर उद्यान येथे ‘ज्येष्ठ नागरिक कट्टा’च्या वतीने भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘ज्येष्ठ नागरिक कट्टा’च्या माध्यमातून सामाजिक तसेच लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात. ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना एकत्र आणण्याचे काम कट्ट्याच्या माध्यमातून केले जात आहे. स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रमही याच उपक्रमांचा एक महत्त्वाचा भाग ठरला.
यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा केला. तसेच परिसरातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी ‘ज्येष्ठ नागरिक कट्टा’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.


Share

One thought on “ज्येष्ठ नागरिकांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *