
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : मालवणी येथील राष्ट्र सेवा दल कार्यालयात ७९वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
विशेष म्हणजे, नव्या पिढीतील जनरेशन अल्फाचे(GEN ALPHA )प्रतिनिधित्व करणाऱ्या अल्फा मुस्कान कनोजिया, अनाबिया अन्सारी आणि फौजिया अन्सारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या उपक्रमातून स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात नव्या पिढीचा सहभाग अधोरेखित झाला.
कार्यक्रमाला इनाया मन्सुरी, रेखा कोटक, सावित्री पोद्दार, राजेश राखपसरे, इशिका जैस्वार, मनोज परमार, प्रथमेश पोद्दार, निसार अली, रमेश परमार आदी सहभागी झाले होते.
यावेळी देशभक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत उपस्थितांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्र सेवा दल, मालवणी कार्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.