
एसएम एस -प्रतिनिधी -सुरेश बोरले.
मुंबई : गोरेगाव पूर्व येथील जयप्रकाश नगरमधील ज्येष्ठ नागरिक कट्टा च्या वतीने आषाढी एकादशीचा सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. उद्यानात आयोजित या कार्यक्रमाला विठ्ठलभक्तांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात कट्ट्याचे सभासद, पांडुरंगाचे निस्सीम भक्त व कीर्तनकार दीपक जोशी यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींची वेशभूषा परिधान करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या कीर्तन, भजन आणि भक्तिमय सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला.
या कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे कार्यवाह गिरीश नाईक यांनी केले. सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने पुढाकार घेणाऱ्या कट्ट्याने आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी परंपरा आणि भक्ती संस्कृतीचा सुंदर संदेश दिला.
यावेळी उपस्थित विठ्ठलभक्तांनी भजन, नामस्मरण आणि सामूहिक प्रार्थनेत सहभागी होत भक्तिरसाचा आनंद लुटला. कार्यक्रमामुळे परिसरात अध्यात्मिक आणि आनंदमय वातावरण निर्माण झाले.
Gd