भीषण आगीत भुल्लर स्टुडिओ खाक..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा बाबू डे

मुंबई :मढ -मार्वे  रोडवरील दाना पाणी येथील  भुल्लर  स्टुडिओत   आज पहाटे आग लागल्याची घटना घडली. ही घटना दिनांक १७ रोजी,सकाळी 6:15 वाजता नोंदवण्यात आली.

 अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत आग विझवण्याचे काम हाती घेतले. सकाळी 6:48 वाजता या आगीला ‘लेव्हल-1’ घोषित करण्यात आले होते.

ही आग ग्राउंड प्लस वन  इमारतीतील सुमारे तीन हजार  चौरस फूट क्षेत्रातील 5 ते 6 गाळ्यांमध्ये पसरली होती. आगीमध्ये इलेक्ट्रिक वायरिंग व उपकरणे, वॉलपेपरचा साठा, फोम मॅट्रेस, कार्पेट, पीव्हीसी शीट्स, लाकडी फर्निचर, परफ्युम्स, कार्यालयीन साहित्य, शूटिंग इक्विपमेंट, एसी युनिट्स व बांबू साहित्य जळून खाक झाले.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 फायर इंजिन, 3 जेट टँकर, एक वॉटर टँकर, रुग्णवाहिका तसेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तैनात होते.घटनास्थळी  पोलिस  पालिका  कर्मचारीही मदतीसाठी उपस्थित होते.

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी 9:12 वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही अग्निशमन दल, पोलीस पुढील तपास करत आहेत.

मढ परिसरात धारवली गाव, दाना पाणी, सह मढ बेट परिसरातील अनेक शूटिंग चे साहित्य असलेले गोदाम, स्टुडिओ ला अनेक वेळी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. सतत घडणाऱ्या  अगीच्या घटनानंवरून सुरक्षा उपाय अथवा व्यवस्थेचा ऑडिट पालिका, अग्निशमन दल करत का असा प्रश्न उपस्थित होतो.


Share

One thought on “भीषण आगीत भुल्लर स्टुडिओ खाक..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *