मलाडमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्र सेवा दलाचे ४४वे रक्तदान शिबिर.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक.

मुंबई, दि. ५ : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्र सेवा दल, मालाड आणि प्रकाश आनंद प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी ४४व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर सकाळी ८.३० ते दुपारी २ या वेळेत ठाणेकर हाऊस, प्रकाश आनंद भुवन, तुरेल पाखाडी, जकेरिया मार्ग, मालाड (पश्चिम) येथे आयोजित करण्यात येणार असून, केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने ते पार पडणार आहे.
या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी इच्छुकांनी ९८९२८८१११२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक सिद्राम बंडगर यांनी केले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *