एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई : : महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून भाजप केवळ राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत असून, २०२३ मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास सरकार टाळाटाळ करत आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.
राजीव गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. १६ एप्रिल रोजी झालेल्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक नव्हे, तर मतदारसंघ पुनर्रचना प्रस्तावाचा पराभव झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून मतदारसंघ पुनर्रचनेद्वारे राजकीय समीकरणे बदलण्याचा भाजपाचा प्रयत्न होता, असा आरोपही त्यांनी केला.
गायकवाड म्हणाल्या की, ‘नारी शक्ती वंदन’ या नावाखाली संसदेची रचना बदलण्याचा प्रयत्न सुरू असून, मतदारसंघ पुनर्रचनेनंतर उत्तर भारतातील जागा वाढून दक्षिणेकडील राज्यांचा वाटा कमी होईल. यामुळे राजकीय फायदा भाजपालाच होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
सध्याच्या ५४३ लोकसभा जागांपैकी महिला आरक्षण लागू झाल्यास सुमारे १८१ जागा महिलांसाठी राखीव होतील, असे सांगत त्यांनी महिला आरक्षणाचा संबंध जनगणना व मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडू नये, अशी मागणी केली. तसेच ओबीसींसाठी उप-आरक्षणाशिवाय हे आरक्षण अपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
लोकसभा निवडणुकांनंतर जनगणना व त्यानंतर पुनर्रचना करून आरक्षण लागू केले जाईल, असे पूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, आता सरकारच प्रक्रियेला विलंब लागेल असे सांगत असल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे त्या म्हणाल्या.
काँग्रेसनेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले होते, याची आठवण करून देत भाजपाचा महिलांबद्दलचा कळवळा ‘पुतणा मावशीचे प्रेम’ असल्याची टीकाही त्यांनी केली.
महिला आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर आमंलात आणावा हि नम्र विनंती आहे सरकार कडे
महिला आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर आमंलात आणावा हि नम्र विनंती आहे सरकार कडे महिलाची