वर्तमानातील ग्रामविनाश आणि गांधींची भूमिकेवर व्याख्यान..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले

मुंबई :स्वातंत्र्यसैनिक वसंत-रजिब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) आणि कोकण जनविकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वर्तमानातील ग्रामविनाश आणि महात्मा गांधींची भूमिका’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६.३० या वेळेत ताडदेव येथील जनता केंद्र, तुळशीवाडी पोस्ट ऑफिसजवळ, मुंबई सेंट्रल (पश्चिम) येथे हा कार्यक्रम होणार आहे.

या व्याख्यानात गाव, पर्यावरण आणि ग्रामीण संस्कृतीसमोरील सद्यस्थितीतील आव्हानांचा आढावा घेत महात्मा गांधी यांच्या ग्रामविकासविषयक विचारांची आजच्या परिस्थितीशी सांगड घालून चिकित्सा केली जाणार आहे. पत्रकार व लेखक चंद्रकांत झटाले हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर नारकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

या वेळी अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी आणि गांधी विचारांचे अभ्यासक जयंत दिवाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि गांधीवादी विचारांच्या वर्तमानातील उपयुक्ततेवर या व्याख्यानातून विचारमंथन होणार आहे.

या कार्यक्रमाला नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, अभ्यासक आणि गांधी विचारांमध्ये रुची असलेल्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) आणि कोकण जनविकास समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Share

3 thoughts on “वर्तमानातील ग्रामविनाश आणि गांधींची भूमिकेवर व्याख्यान..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *