
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे
मुंबई :येळवण बौद्धजन विकास मंडळाचे मुंबईतील ज्येष्ठ सल्लागार शरद भिवा जाधव तसेच ग्रामीण मंडळाचे चिटणीस व तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष दशरथ भिवा जाधव यांच्या मातोश्री, ग्रामीण महिला मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या व माजी सल्लागार सुजाता भिवा जाधव (वय ७५) यांचे दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईतील नायर रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. सर्वांशी प्रेमाने संवाद साधणाऱ्या आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या सुजाता जाधव यांच्या जाण्याने येळवण बौद्धजन विकास मंडळासह सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
राजापूर तालुक्यातील येळवण हे त्यांचे मूळ गाव असून, ग्रामीण महिला संघटनांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले.
त्यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम दि. ४ जानेवारी २०२६ रोजी दहिसर येथे होणार आहे.
Rest in peace mam
आदरांजली
ओम शांति ओम