एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
कार्डिनल ऑस्वाल्ड ग्रेशियस यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे येथे सोहळा
मुंबई, ता. ३० : भारतातील ख्रिश्चन समाजाचे राष्ट्राच्या जडणघडणीतील योगदान अधोरेखित करणाऱ्या ‘Christians in India – The Nation’s Vital Asset’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (ता. ३१) वांद्रे पश्चिम येथे होणार आहे. बॉम्बे कॅथॉलिक सभेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला कार्डिनल ऑस्वाल्ड ग्रेशियस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या पुस्तकाचे संपादन बीसीएसचे माजी अध्यक्ष डॉ. लुईस डिसिल्वा यांनी केले आहे. भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जीवनात ख्रिश्चन समाजाचे योगदान मांडण्याच्या दृष्टीने या पुस्तकाला महत्त्व आहे.
शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता वांद्रे पश्चिम येथील सेंट पॉल मीडिया कॉम्प्लेक्समधील अल्बेरिओने हॉल येथे हा प्रकाशन सोहळा होणार आहे. डुरुएलो कॉन्व्हेंट स्कूलसमोर, सेंट थेरेसा रोड येथे हे सभागृह आहे.
बॉम्बे कॅथॉलिक सभेचे प्रवक्ते डॉल्फी डिसोझा यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.