पालिकेच्या दुय्यम अभियंता ला लाच स्वीकारताना अटक

Share

नवी मुंबई महानगरपालिकेनंतर आता मुंबई

मुंबई : महानगरपालिकेतील अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. एफ-नॉर्थ विभागात कार्यरत दुय्यम अभियंता विशाल भालचंद्र वाणी याला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्याने एका बांधकाम साईटसाठी जलनिष्कासन परवानगी देण्यासाठी तब्बल १० लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत ACB कडे धाव घेतल्यानंतर सापळा रचण्यात आला.
दरम्यान, ठरल्याप्रमाणे २.५ लाख रुपये स्वीकारताना ACB पथकाने विशाल वाणी याला रंगेहात पकडले. ही कारवाई प्रजन्य जल वाहिनी विभागाशी संबंधित प्रकरणात करण्यात आली आहे.
या घटनेमुळे पालिकेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला असून, संबंधित अधिकाऱ्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.


Share

One thought on “पालिकेच्या दुय्यम अभियंता ला लाच स्वीकारताना अटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *