
एस एमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मुंबई, : दिव्यांग व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अंधेरी-नवपाडा येथे २० ते २२ ऑगस्ट २०२६ दरम्यान मोमबत्ती निर्मिती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. National Skill Foundation (NSFI) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणात २० दिव्यांग सहभागीांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मोमबत्ती निर्मितीचे प्रशिक्षण घेतले.प्रशिक्षणादरम्यान सहभागीांना मोमबत्ती तयार करण्याची प्रक्रिया, आवश्यक साहित्य, निर्मितीची पद्धत तसेच या कौशल्याचा स्वयंरोजगारासाठी कसा उपयोग करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दिव्यांग व्यक्तींमध्ये कौशल्य विकसित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्याचा NSFIचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या उपक्रमासाठी सदानंद पगारे, रेखा केवट यांनी विशेष उपस्थित राहून सहभागीांना मार्गदर्शन केले. तसेच प्रशिक्षणासाठी आवश्यक हॉल, प्रात्यक्षिक व इतर व्यवस्थेसाठी सहकार्य केल्याबद्दल जितेंद्र भास्कर आणि एंथोनी नाडर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.या प्रशिक्षणाचे ग्राउंड-लेव्हल नियोजन व समन्वय National Skill Foundationच्या Field Project Coordinator वनिता वाठोरे यांनी केले. दिव्यांगांना केवळ प्रशिक्षण देणे नव्हे, तर त्या कौशल्याच्या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगाराची दिशा देऊन आर्थिक स्वावलंबनाकडे नेणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.