पठारेवाडीत गटाराचे पाणी रस्त्यावर..

Share

दुर्गंधी, अस्वच्छतेने नागरिक त्रस्त; तातडीने उपाययोजनेची मागणी

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई : मालाड पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ३२ मधील पठारेवाडी येथील जगन्नाथ मंदिरासमोर गटाराचे घाण पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साचलेल्या पाण्यामुळे वाहनांचे अपघात होण्याचीही शक्यता आहे.

गटाराच्या पाण्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली असून, संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने या समस्येची दखल घेऊन पाणी निचऱ्यासाठी पंपाची व्यवस्था करावी आणि गटाराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.तसेच धुर फवारणी, औषध फवारणी niya

करण्यात यावी जेणेकरून डासांची उत्पत्ती वर नियंत्रण येईल अशा उपाययोजना पालिका पी पश्चिम विभागाच्या वतीने करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

आम्हाला या घाण आणि दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट शोधत शोधत काढावी लागते. त्यामुळे घाण  पाण्यातून ये जा केल्याने आमच्या घरात ही ही घाण, दुर्गंधी शिरते त्याचा दुषपरिणाम आमच्या कुटुंबियांच्या आरोग्या वर  ही होत आहे.-रहिवासी महिला शालिनी काटे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *