एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मुंबई : कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Sr. PI) सुशीलकुमार गायकवाड यांचे आज कर्तव्यावर जात असताना दुर्दैवी निधन झाले. पोलीस वाहनातून पोलीस ठाण्याकडे जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे.
गायकवाड यांच्या आकस्मिक निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्तव्यावर जात असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने पोलीस दलातील सहकाऱ्यांसह परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.