रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १४५ रक्त पिशव्यांचे संकलन..

Share

एसएमएस-प्रतिनिधी -सोमा डे.

मालाड, ता. १६ (बातमीदार) : मुंबईत जाणवणारी रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र – मालवणी आणि रेड एंजल्स – मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणी येथील म्हाडा परिसरातील गोल्डन बँक्वेट हॉलमध्ये रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मालवणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल १४५ रक्तपिशव्यांचे संकलन केले.

या रक्तदान शिबिरात मालवणी परिसरातील तरुणांसह विविध वयोगटांतील रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र आणि रेड एंजल्सच्या स्वयंसेवकांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. रक्तदात्यांच्या सहकार्यामुळे १४५ युनिट रक्त संकलित करण्यात यश आले.

रक्तदानातून संकलित झालेले रक्त गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार असून, मुंबईतील रक्तटंचाई कमी करण्यासाठी या उपक्रमाचा हातभार लागेल, अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली.

१४५ रक्तपिशव्या म्हणजे केवळ रक्तसंकलन नव्हे, तर १४५ गरजू रुग्णांना जीवनाची नवी आशा देण्याचा प्रयत्न आहे, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली. तसेच रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आणि शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचे आयोजकांनी आभार मानले.


Share

3 thoughts on “रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १४५ रक्त पिशव्यांचे संकलन..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *