एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या ‘उत्तरदायित्व फाउंडेशन’ ने आपला पहिला सामाजिक उत्तरदायित्व पुरस्कार देण्यासाठी ‘आम्ही आंबेडकरवादी’ या तरुणांच्या संघटनेची निवड केली आहे. ‘आम्ही आंबेडकरवादी ही संघटना 2017 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन काळात सलग तीन दिवस शिवाजी पार्क परिसरात स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मुंबई महानगरपालिकेला मदत करते. तसेच आंबेडकर अनुयायांना स्वच्छतेच्या बाबतीमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोणती खबरदारी घ्यावी याचे मार्गदर्शनही करत असते. शनिवार दिनांक 2 मे रोजी सायं. 5:30 वाजता धुरु हॉल, छबिलदास शाळेसमोर दादर पश्चिम येथे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव अॅड. प्रणितकुमार म्हस्के यांनी केले आहे.
Congrats