आ.अमित साटम यांच्या विरोधात मनसेचे आंदोलन.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मालाड पश्चिम विधानसभा विभागाच्या वतीने मंगळवारी ७ जुलैला संध्याकाळी मालाड रेल्वे स्थानक परिसरात आमदार अमित साटम यांच्या कथित बेताल वक्तव्याचा निषेध करत निदर्शने करण्यात आली.

हे आंदोलन विभागाध्यक्ष शशांक डेहलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आमदार अमित साटम यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच अशा प्रकारची वक्तव्ये जनतेची दिशाभूल करणारी असून ती तात्काळ मागे घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली.

या निदर्शनात मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मनसेचे महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले.


Share

2 thoughts on “आ.अमित साटम यांच्या विरोधात मनसेचे आंदोलन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *