इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई : केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल व सीएनजीच्या वाढत्या दरांच्या निषेधार्थ शिवसेना विभाग क्रमांक २ च्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी विभाग प्रमुख संतोष राणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या धोरणाविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनात विभाग समन्वयक अशोक पटेल, विभाग संघटीका मनाली चौकीदार, विधानसभा प्रमुख कैलास कणसे, राजू खान, संतोष धनावडे, विधानसभा संघटक गणेश गुरव, संतोष होळम यांच्यासह महिला पदाधिकारी तसेच रिक्षा सेनेचे चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक, रिक्षाचालक आणि वाहनधारकांवर आर्थिक भार वाढत असल्याचे सांगत केंद्र सरकारने तातडीने इंधन दर कमी करावेत, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *