जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारणार.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -दिनेश गोसावी.

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन वर्षांसाठी गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) आणि गुणवंत क्रीडा मार्गदर्शक असे एकूण चार पुरस्कार देण्यात येणार आहेत.
या पुरस्कारासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारातील पात्र खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांनी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी केले आहे.
पुरस्कारासाठीचा विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथून प्राप्त करून घेता येईल. अर्ज आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत बंद लिफाफ्यात ३१ ऑगस्टपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे ८८८८८९१६३२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.


Share

One thought on “जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *