आसिफ पावसकर यांना मातृशोक

Share

जुबेदा लतीफ पावसकर यांचे निधन.

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

आसिफ पावसकर यांना मातृशोक

जुबेदा लतीफ पावसकर यांचे निधन

मुंबई : मढ जेट्टी, कोकण नगर येथील रहिवासी, काँग्रेस पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आसिफ पावसकर यांच्या मातोश्री जुबेदा लतीफ पावसकर (वय ७९) यांचे अल्पशा आजाराने ७ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३५ वाजता राहत्या घरी निधन झाले.

मनमिळाऊ वृत्ती आणि हसतमुख स्वभावामुळे जुबेदा पावसकर यांची परिसरात चांगली ओळख होती. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता वर्सोवा मुस्लिम दफनभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते, नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती आसिफ पावसकर यांनी दिली.


Share

One thought on “आसिफ पावसकर यांना मातृशोक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *