एसएमएस -प्रतिनिधी -दिनेश गोसावी
मुंबई, ता. ७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल शुक्रवार, ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी दिली.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.
अधिकृत संकेतस्थळे :
results.digilocker.gov.in�
mahahsscboard.in�
sscresult.mkcl.org�
results.targetpublications.org�
results.navneet.com�
tv9marathi.com�
Indian Express Education Results Page�
विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण ऑनलाईन पाहता येणार असून त्याची प्रिंटआऊटही काढता येईल. तसेच DigiLocker App मध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
शाळांना त्यांच्या शाळेचा एकत्रित निकाल महामंडळाच्या शाळा लॉगिन पोर्टलवर� उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती तसेच पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी अर्ज विद्यार्थी स्वतः किंवा शाळांमार्फत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करू शकतील.
Ohhgd news