दुरंतो एक्सप्रेसला बोरीवलीत थांबा देण्याची मागणी….

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

मुंबई : पॅसेंजर्स अँड ट्रॅफिक रिलीफ असोसिएशन   (PATRA), ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन , वेलफेयर  ऑरगॅनिसाशन फॉर रोड सेफ्टी अँड प्रिव्हेन्शन  ऑफ ऍक्सीडेन्ट  मुंबई , अमन कमिटी, द हलायी मेमन खंडवानी जमात, मुंबई, सबरबन हलायी मेमन जमात, नॅशनल हुमान राईट्स असोसिएशन  यांच्या वतीने दुरंतो एक्सप्रेस (22209) या गाडीला बोरीवली रेल्वे स्थानकावर दोन्ही दिशांना दोन मिनिटांचा थांबा देण्याची मागणीरेल्वे मंत्र्यांना मेल द्वारे  करण्यात आली आहे.

विविध सामाजिक तसेच रेल्वे प्रवासी  संघटनांच्या वतीने रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, मुंबई सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) दरम्यान धावणारी दुरंतो एक्सप्रेस सध्या मुंबई सेंट्रलवरून सुटल्यानंतर थेट वडोदरा जंक्शन येथेच थांबत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बोरीवली, कांदिवली, मालाड ते विरार परिसरातील हजारो प्रवाशांना या वेगवान गाडीचा लाभ घेता येत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, बोरीवली हे पश्चिम उपनगरातील महत्त्वाचे रेल्वे केंद्र असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे प्रमुख थांबे येथे आहेत. दुरंतो एक्सप्रेसला येथे अवघा दोन मिनिटांचा थांबा दिल्यास प्रवासाच्या वेळेत फारसा फरक पडणार नाही. उलट उत्तर मुंबईतील प्रवाशांना मुंबई सेंट्रल किंवा वांद्रे टर्मिनसपर्यंत लोकलने जाण्याचा अतिरिक्त त्रास वाचणार आहे.

या मागणीची प्रत पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई सेंट्रल यांनाही देण्यात आली असून, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.अशी माहिती मन्सूर दर्वेश यांनी दिली.


Share

One thought on “दुरंतो एक्सप्रेसला बोरीवलीत थांबा देण्याची मागणी….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *