मनसे करणार नाले सफाई ची पोल खोल..

Share

एसएमएस -प्रतिनिधी – उत्कर्ष बोरले.

मुंबई, ता. १२ : पावसाळ्यापूर्वी मुंबईतील शंभर टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या कामाची पोलखोल करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीने शनिवारी, १३ जून रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.
मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी नालेसफाईची प्रत्यक्ष स्थिती बॅनरच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडून महानगरपालिकेच्या कामाचा निषेध नोंदविण्यात येणार असल्याची माहिती जी-उत्तर विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष तथा मनसे नेते नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिली.
हे आंदोलन शनिवारी सकाळी १०.३० वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातील मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ होणार आहे. या आंदोलनात पक्षाचे
पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालिकेने नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला असला, तरी अनेक भागांमध्ये नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचलेला असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही किल्लेदार यांनी स्पष्ट केले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *