मालाड स्थानकावरील गैर सोयी बाबत मनसेचे ; अल्टिमेटम.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे.

मुंबई : मालाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांना दररोज अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत असून, छताची अपुरी व्यवस्था, शौचालयांची कमतरता तसेच तिकीट घराच्या सुविधांचा अभाव यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालाड पश्चिम व कांदिवली विधानसभा विभागाच्या वतीने शुक्रवारी मालाड स्टेशनचे स्टेशन मास्टर संतोष परब यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानक परिसरातील तसेच प्लॅटफॉर्मवरील गैरसोयी तातडीने दूर करण्याची मागणी केली. प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, यासाठी मनसेच्या वतीने रेल्वे प्रशासनाला १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

निर्धारित कालावधीत प्रवाशांच्या समस्या मार्गी न लागल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी विभाग अध्यक्ष शशांक संदेश डेहलीकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Share

One thought on “मालाड स्थानकावरील गैर सोयी बाबत मनसेचे ; अल्टिमेटम.

  1. जनते ने पण या सर्व घटनेचा आढावा घेतला पाहिजे आपल्या हक्का साठी लढले पाहिजे घरात बसुन काहि होत नाही कोण तरी लडतो आहे आपण फक्त मजा बघायची हि आजची परिस्थिती आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *