महाराष्ट्र दिनानिमित्त रक्तदान १०५ पिशव्यांचे रक्तसंकलन.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

मुंबई :महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जोगेश्वरी येथील श्री साई अमर मित्र मंडळाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे ब्लड सेंटरच्या सहकार्याने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल १०५ पिशव्यांचे रक्तसंकलन करण्यात आले.
या वेळी शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर, स्थानिक आमदार बाळा नर तसेच नगरसेवक जितेंद्र वळवी यांनी शिबिराला भेट देत रक्तदात्यांचे कौतुक केले.
मंडळाचे संस्थापक अमर मालवणकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेले हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना मंडळाच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
रक्तदाते, सहकारी कार्यकर्ते आणि दानदाते यांच्या सहकार्याबद्दल मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आल्याची माहिती अमर मालवणकर यांनी दिली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *