वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात घेतला अखेरचा श्वास!

Photo courtesy social media.
मुंबई :ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर) वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील डोना पाउला येथील निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नाना पाटेकर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देण्यात आला. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या मृत्यूची वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू असून शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची स्वतंत्र छाप उमटविणारे नाना पाटेकर यांनी अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘अग्निसाक्षी’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’ यांसह अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन आणि लेखन क्षेत्रातही काम केले.
नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रभावी आणि बहुआयामी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. प्राथमिक वृत्तांमध्ये हृदयविकाराचा झटका कारण म्हणून नमूद आहे; अंतिम वैद्यकीय कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल.
एक चांगला कलाकार आपल्या या जगातून निरोप घेऊन गेला मात्र जाता खूप काही देऊन आणि खूप काही शिकवून गेला. भावपूर्ण श्रद्धांजली
Rip