उत्तर मुंबई महिला काँग्रेसच्या महासचिवपदी पूनम शिंदे.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

मुंबई :संभाजी ब्रिगेड उत्तर मुंबई जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पूनम शिंदे यांनी संभाजी ब्रिगेडचा राजीनामा देत आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
राजीव गांधी भवन, मुंबई येथे आयोजित बैठकीत मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ॲड. तुलीप मिरांडा तसेच उत्तर मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रगती राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या बैठकीला पूनम शिंदे यांच्यासह नंदा तळवटकर, गायत्री टपाल, सुरेखा अलमवार, सुरेखा सब्बन यांच्यासह सुमारे १५ महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
यावेळी सर्व महिला कार्यकर्त्यांच्या महिला काँग्रेसमधील प्रवेशाची अधिकृत घोषणा करण्यात आली. तसेच पूनम शिंदे यांची उत्तर मुंबई जिल्हा महिला काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
याशिवाय नंदा तळवटकर यांची प्रभाग क्रमांक १४ च्या अध्यक्षपदी, सुरेखा अलमवार यांची प्रभाग क्रमांक १४ च्या सचिवपदी, तर गायत्री टपाल यांची प्रभाग क्रमांक १४ च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्त्यांमुळे उत्तर मुंबईतील महिला काँग्रेस संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *