एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोरले.
…मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जुहू तारा येथे जागतिक योग दिन hसाजरा करण्यात आला. त्याप्रसंगी जुहू व आसपासच्या परिसरातील योग विद्यार्थी व प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एरोबिक्स आणि योग यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. हजारोंच्या संख्येने योगी उपस्थित होते. समारोपासाठी स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व स्वतः मुख्यमंत्री जातीने उपस्थित होते. सदर प्रसंगी चटई वाटप, तसेच अल्पोपहार आणि पाण्याची चांगली व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पोलिस बंदोबस्तही चोख होता. योग विद्यार्थी सौ. कविता सुथारी यांच्या योग संस्थेने मोठ्या संख्येने येथे सहभाग घेतला होता. ही विशेष बाब ठरली.
