‘लोकशाहीचा काळा दिवस’ काँग्रेस चे आंदोलन..!!

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले

मुंबई : काँग्रेसच्या वतीने ८ ऑक्टोबर हा ‘लोकशाहीचा काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येणार असून, त्यानिमित्त उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मालाड पश्चिम येथे निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच इंडिया आघाडीतील खासदार आणि वरिष्ठ नेत्यांशी करण्यात आलेल्या कथित गैरवर्तन, लाठीचार्ज तसेच निवडणूक व्यवस्थेच्या निष्पक्षतेशी संबंधित प्रश्नांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार आणि माजी मंत्री तथा आमदार अस्लम शेख यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे. गुरुवारी (८ ऑक्टोबर) सायंकाळी ४ वाजता मालाड पश्चिम रेल्वे स्थानकासमोर हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजपती बी. यादव यांनी काँग्रेसचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवा दल, NSUI तसेच विविध विभाग व सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.


Share

One thought on “‘लोकशाहीचा काळा दिवस’ काँग्रेस चे आंदोलन..!!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *