२१ वर्षांपासून फरार २ आरोपींना अटक

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

मुंबई, : डीएन.नगर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील जाहीरनाम्यातील दोन फरारी आरोपींना शोधून काढत पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएन.नगर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ४४/२००५ अंतर्गत भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४ व ३४ अन्वये दाखल प्रकरणातील आरोपी गुलाम नादर गुलाम रसूल शेख (वय ५८) तसेच गुन्हा क्रमांक ४१४/२००५ मधील कलम ३३७, ४२७ व ३०४ (अ) अन्वये दाखल प्रकरणातील आरोपी मोहम्मद गुलाम नबी उर्फ मोहम्मद जमाल मोहम्मद उस्मान शेख (वय ५३) यांच्याविरुद्ध अंधेरी पूर्व येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, १० वे न्यायालयात खटला सुरू आहे.
मात्र, सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने दोन्ही आरोपींविरोधात जाहीरनामा जारी केला होता. त्यानंतर डीएन.नगर पोलिसांनी त्यांच्या राहत्या परिसरात शोधमोहीम राबविली असता संबंधित आरोपींनी आपली ओळख लपवून नाव बदलून वास्तव्य केल्याची माहिती समोर आली.
त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता तेच संबंधित गुन्ह्यांतील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मचिंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजली वाणी, पोलीस हवालदार दुगाणे, साबळे तसेच पोलीस शिपाई घोघळे, मेहेत्रे आणि पटेल यांच्या पथकाने केली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *