यंदा पाऊस उशिरा व कमी पडणार?

Share

एसएमएस -प्रतिनिधी-सुरेश बोरले.

साधारणपणे ७ जून रोजी दरवर्षी येणारा पाऊस, आज १५ जून उजाडला आहे.तर अलनिनो मुळे पाऊस हा तळ कोकणातच अडकलेला आहे.पण तेथेही पाऊसाचा वेग मंदावला आहे.महाराष्ट्रातला
बळीराजा मात्र चिंताग्रस्थ आहे.कारण मृग नक्षत्र हे तर
अक्षरशः कोरड गेलेलं आहे. शेतकरी ह्याच वेळेस पेरणी करतात,आता त्यांच्या पेरण्या रखडलेल्या आहेत.तर ठाणे, मुंबई,पुणे,नागपूर,कोल्हापूर व इतर महत्त्वाच्या शहरातील धरणांनी तळ गाठलेला आहे.त्यामुळे बळीराजा आणि शहरी नागरिकही पिण्याच्या पाण्याच्या संकटात आहे.तर हवामान तज्ञ श्री.रामचंद्र साबळे ह्यांच्या मते ह्या वर्षी पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पडून तो वेळे
अगोदर परतणार आहे.त्यांनी एकंदरीत ४५ वर्षाचा पाऊसाचा अभ्यास करूनच ही भाकित केलेलं आहे व जागतिक वृक्ष तोडीची हा मोठा परिणाम आहे.असे ही त्यांनी नमूद केले.
एकंदरीत भारी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार आहे,ही निश्चित!


Share

One thought on “यंदा पाऊस उशिरा व कमी पडणार?

  1. खुप वाईट परिस्थिति आहे त्यात जर पाऊसउशीराने आला तर प्रचंड समस्या निर्माणहोतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *