निवृत्त पोलिस महानिरीक्षक किशोर जाधव यांचे निधन.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

निवृत्त पोलिस महानिरीक्षक किशोर जाधव यांचे निधन

पुणे : महाराष्ट्र पोलिस दलातील निवृत्त पोलिस महानिरीक्षक (IGP) श्री. किशोर जाधव यांचे शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी पुणे येथील सह्याद्री रुग्णालयात बहुअवयव निकामी झाल्याने निधन झाले. ते गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या निधनाने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

किशोर जाधव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन शनिवार (ता. १२) सप्टेंबर रोजी सकाळी ८.१५ वाजता स्प्रिंग व्हॅली, ए-२, फ्लॅट क्रमांक ४०५, सीझन्स मॉलजवळ, मगरपट्टा, हडपसर, पुणे येथे ठेवण्यात येणार आहे.

त्यानंतर सकाळी १० वाजता पार्थिव त्यांच्या मूळ गावी माणेवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथे नेण्यात येणार असून, तेथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

किशोर जाधव यांच्या निधनाने जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि जाधव परिवाराला हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *