मार्वे रोड वर बसच्या चाकाखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

Share

एसएमएस-प्रतिनिधी -सोमा डे.

राठोडी पेट्रोल पंपासमोरील घटना; अपघातामुळे वाहतूक कोंडी

मुंबई : मालाड पश्चिम येथील राठोडी परिसरात मार्वे रोडवरील पेट्रोल पंपासमोर सोमवारी (१२ ऑक्टोबर) दुपारी झालेल्या बस अपघातात सैफुल वैद्य (वय ३५) यांचा मृत्यू झाला. बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दुपारी २ ते २.३०वाजतच्या च्या सुमारास हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. सैफुल वैद्य हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी होते. अपघातानंतर त्यांना शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे मार्वे रोडवरील राठोडी परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

या प्रकरणी मालवणी पोलिसांकडून पंचनामा व पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.


Share

One thought on “मार्वे रोड वर बसच्या चाकाखाली आल्याने तरुणाचा मृत्यू”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *